९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा बुलडाण्यात होणार असल्याचे निश्चित झाले.
मुंबई- ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा बुलडाण्यात होणार असल्याचे निश्चित झाले. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमात साहित्य संमेलन भरवले जाणार आहे.
९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्ली आणि बडोदा या ठिकाणाची नावे चर्चेत होती. मात्र अखेर हे संमेलन हिवरा आश्रमात भरवण्यात येणार आहे. आता बुलडाण्यातील ग्रामीण भागात किती साहित्य रसिक पोहोचतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
९० वे साहित्य संमेलन डोंबिवलीत पार पडले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे होते.