बॉलिवूडच्या सुंदरीमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे नाव सर्वात पहिले घेतले जाते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ऐश्वर्याने निव्वळ प्रसिद्धीसाठी कधीच खालची पातळी गाठली नाही.
मुंबई- बॉलिवूडच्या सुंदरीमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे नाव सर्वात पहिले घेतले जाते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ऐश्वर्याने निव्वळ प्रसिद्धीसाठी कधीच खालची पातळी गाठली नाही. ऐश्वर्याच्या चित्रपटसृष्टीतील स्वच्छ इमेजमुळे मलेशियातील एका दुकानदाराला मोठा दंड भरावा लागला आहे.
ऐश्वर्या राय बच्चनने एका घडयाळाच्या ब्रँडसाठी फोटोशूट केले होते. मलेशियात राहणा-या एका व्यक्तीचे घडयाळाचे दुकान असल्याने त्याने दुकानावर काही पोस्टर्स लावले होते. पण तेथील स्थानिक समितीला सदर पोस्टर्स उत्तेजक वाटल्याने त्यांनी दुकानदारास पोस्टर्स काढावयास लावले.
इतकेच नाही तर ऐश्वर्याचे पोस्टर लावल्याने दुकानदाराला दंडही भरावा लागला. आपल्याला हे पोस्टर्स कंपनीकडूनच आल्याचे दुकानदाराने सांगितले. पण समितीने त्याचे काहीच ऐकले नाही. या पोस्टर्समुळे तरुणांवर वाईट परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
लवकरच ऐश्वर्या ऐ दिल है मुश्कील या चित्रपटात रणबीरसोबत झळकणार आहे. या चित्रपटात अनुष्का शर्माचीही भूमिका आहे.
रणबीर आणि ऐश्वर्याची काही रोमॅण्टिक दृश्ये या चित्रपटात होती. पण बच्चन कुटुंबीयांच्या नाराजीनंतर सदर दृश्ये चित्रपटातून हटविल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये रंगली होती. यापूर्वी ऐश्वर्या सरबजित या चित्रपटात रणदीप हुड्डासह झळकली होती.