जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.
नवी दिल्ली- जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.
एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करांच्या जागी फक्त जीएसटी हा एकच कर लागू होईल. त्याआधी लोकांपर्यंत जीएसटी म्हणजे काय, त्याचे फायदे काय या सर्व गोष्टी लोकांच्या मनात बिंबविण्यासाठी बिग बींची निवड करण्यात आली आहे.
याआधी अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची जीएसटीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली होती
अमिताभ बच्चन त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून विविध सामाजिक संदेश नेहमीच देत असतात. नो स्मोकिंगच्या कॅम्पेनपासून ते व्यायामापर्यंतचे प्रत्येक सल्ले ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांना देत असतात.
T 2460 –@cbec_india .. a campaign to explain GST .. I was asked, I did it .. pic.twitter.com/Cavjqtkc1W
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 19, 2017
a campaign to explain and introduce GST .. they asked me i did it .. https://t.co/ZHXlTVDdyP
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 19, 2017