एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे नियंत्रण लवकरच स्पाईस जेटचे सहसंस्थापक आणि मालक अजय सिंह यांच्याकडे येणार आहे.
नवी दिल्ली- एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे नियंत्रण लवकरच स्पाईस जेटचे सहसंस्थापक आणि मालक अजय सिंह यांच्याकडे येणार आहे. अजय सिंह यांनी एनडीटीव्ही वाहिनीतील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. सध्या एनडीटीव्हीचे नियंत्रण प्रसिद्ध पत्रकार प्रणव रॉय यांच्याकडे आहे. या वाहिनीचे संस्थापक प्रणव रॉय, राधिका रॉय आणि प्रमोटर कंपनी आरआरपीआर होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड सीबीआय चौकशीचा सामना करत आहेत.
शेअर्सच्या व्यवहारात पारदर्शकता नसून लपवाछपवी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच प्रकरणी रॉय यांची चौकशी सुरू आहे. अजय सिंह हे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होते. एनडीटीव्ही वाहिनी खरेदी करण्याचा निर्णय पक्का झाला असून, वाहिनीसह संपादकीय अधिकार अजय सिंह यांच्या हाती जाणार आहेत असे सूत्रांनी सांगितले.
सीबीआयने रॉय यांच्या निवासस्थानी ५ जून रोजी छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. छापेमारीची ही कारवाई म्हणजे पत्रकारीतेच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले होते. स्पाईस जेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांच्याकडे एनडीटीव्हीचे ४० टक्के शेअर्स असतील. प्रणव आणि राधिका रॉय यांच्याकडे २० टक्के शेअर्स असतील. मुंबई शेअर बाजारातील जून २०१७ पयर्ंतच्या आकडेवारीनुसार एनडीटीव्हीच्या प्रमोटर्सकडे ६१.४५ टक्के हिस्सा आहे. ३८.५५ टक्के हिस्सा सार्वजनिक शेअरधारकांकडे आहे. अजय सिंह एनडीटीव्हीचे ४०० कोटीचे कर्जही चुकवतील हा एकूण व्यवहार ६०० कोटींचा असून, त्यातील १०० कोटी रुपये रॉय कुटुंबाला देण्यात येतील.
[EPSB]
[/EPSB]