![mesh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh.gif) |
नातेसंबंध गैरसमजुतीमुळे दुरावतील
मेष – तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रेत सुरू होईल. एखाद्या पार्टीत तुमची कुणीतरी थट्टा करतील; परंतु तुमची बुद्धिमत्ता वापरून बालंट येण्यापासून टाळा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीशी असलेले नातेसंबंध गैरसमजुतीमुळे दुरावतील. प्रेम करणे हा नाजूक व्यवहार आहे हे तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे प्रिय व्यक्तीला गृहीत धरू नका. तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत.
लकी क्रमांक :१
|
![rushabh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/rushabh.gif) |
धावपळीचा सप्ताह
वृषभ – सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. मित्र महत्त्वाचे असतात. पण आज तुमचे स्टेट्स ‘बिझी’ असेच ठेवा. कारण कामाच्या ठिकाणी तुमचा अत्यंत धावपळीचा सप्ताह असणार आहे. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.
लकी क्रमांक : ९
|
![mithun](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mithun.gif) |
डॉक्टरांचा सल्ला घ्या
मिथुन – शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्टय़ा कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. ग्रुपमध्ये सामील होणे दिलचस्प असेल, पण खर्चिकदेखील ठरेल. विशेषत: तुम्ही जर दुस-यांवर खर्च करणे थांबवले नाही तर, आपल्या पालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यांचा आजार आणखी वाढवू शकते. त्यांना ताबडतोब आराम मिळावा या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या प्रिय व्यक्तीचा मूड अस्थिर झाल्याने प्रणयराधन करणे शक्य होणार नाही. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण-तणावाचे मळभ असेल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. लकी क्रमांक : ७
|
![karak](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/karak.gif) |
हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील
कर्क – तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. तुमच्या बॉसचा मूड कदाचित खूप खराब असेल, त्यामुळे त्याला हाताळणे तुम्हाला कठीण जाऊ शकेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा सप्ताह आहे. आरोग्याची नीट काळजी घ्या.
लकी क्रमांक : १
|
![singh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/singh.gif) |
व्हीडिओ गेमपासून सावधान
सिंह – देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. आर्थिक बाबी हाताळताना अधिक काळजी घेणे, सावधानता बाळगणे ही काळाची गरज आहे. तुमचा फुरसतीचा वेळ हा नि:स्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबीयांच्या आनंदात मोलाची भर पडेल. प्रेमात तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. ऑफिसमध्ये व्हीडिओ गेम खेळल्यामुळे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या अफवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील.
लकी क्रमांक : ९
|
![kanya](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kanya.gif) |
कुटुंबासाठी आनंददायी बातमी
कन्या – तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुमचा जोडीदार रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कदाचित असे काम करावे लागेल, जे तुम्ही गेली कित्येक वर्षे टाळत होतात. निकटच्या सहका-यांशी अनेक मतभेद झाल्याने तणावपूर्ण जाईल. तुमचे असणे हे त्याच्या/तिच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.
लकी क्रमांक : ७
|
![tula](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/tula.gif) |
तणाव निर्माण होण्याची शक्यता
तूळ – तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. अर्धवट, अयोग्य कामात स्वत:ला गुंतवू नका, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी बिघडलेली असू शकेल. तुमचे शत्रू तुमच्याविरोधात काही कट रचू शकतील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.
लकी क्रमांक : १
|
![wrachik](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/wrachik.gif) |
ऊर्जा मिळेल
वृश्चिक – शारीरिक तसेच मानसिकदृष्टय़ा तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्त्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. कौटुंबिक आयुष्याला योग्य तेवढा वेळ आणि लक्ष द्या. कार्यालयीन कामातील अतिरेकामुळे कौटुंबिक पातळीवर अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्ही त्यांची काळजी करता हे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कळू द्या. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. लकी क्रमांक : २
|
![dhanu](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/dhanu.gif) |
व्यावसायिकांना चांगला सप्ताह
धनु- तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. कुटुंबातील सदस्यांची आरोग्य स्थिती तुमच्या तणावाचे कारण होऊ शकते. प्रणयराधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. व्यावसायिकांना चांगला सप्ताह. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही, तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. साडेसातीचा त्रास जाणवेल, काळजी घ्या. कुठेही पैसे गुंतवू नका.
लकी क्रमांक : ८
|
![mesh1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh1.gif) |
रोष ओढवून घ्याल
मकर- स्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. घरात कोणतेही बदल करायचे असतील, तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. तुमच्या कामाचा तणाव घालविण्यासाठी लागणारा वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.
लकी क्रमांक : २
|
![kumbh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kumbh.gif) |
जोडीदाराकडून आनंद गमावून बसाल
कुंभ- कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्याच करा. जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. घरगुती कर्तव्ये टाळणे आणि पैशावरून भांडण करण्यामुळे तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा आनंद गमावून बसाल. तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा.
लकी क्रमांक : ९
|
![meen](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/meen.gif) |
कौटुंबिक सुखाचा आनंद
मीन – तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. आर्थिक अडचणींमुळे टीका आणि वादविवादाची परिस्थिती उद्भवेल. आपल्याकडून अतिअपेक्षा करणा-यांना नाही म्हणायची तयारी ठेवा. कार्यालयातील ताणतणाव घरापर्यंत येऊ देऊ नका. त्याने आपल्या कुटुंबाच्या सुखाला धक्का बसू शकतो. कार्यालयातील प्रश्न कार्यालयातच सोडविणे श्रेयस्कर आहे, जेणेकरून घरी कौटुंबिक सुखाचा आनंद घेता येईल. तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. तुम्हीही काहीही करू शकाल. तुम्ही प्रभावी स्थितीत असाल. आपल्या वाटेत येणा-या सर्वाशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा.
लकी क्रमांक : ७
|