|
नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल
मेष – सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करणे कमी केले नाही तर तुम्ही कामाच्या ठिकाणी कदाचित घोडचूक कराल. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.
लकी क्रमांक : २
|
|
भावनांवर ताबा ठेवा
वृषभ – काही न टाळता येण्याजोगे पाहुणे भेटतील. परंतु तुमच्या भावनांवर ताबा ठेवा. स्वनियंत्रणाची गरज आहे. तो तुमच्या चारित्र्याचा अर्क आहे. भेट तुमच्या फायद्याची ठरणार असल्याने उगीच ताण घेऊ नका. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही फक्त करू शकता. तुमच्या लहरी स्वभावाला आवर घाला, अन्यथा तुमची मैत्री तुटू शकते. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. तुम्हाला कदाचित वैवाहिक आयुष्यातील टोकाच्या बाजूची अनुभूती येईल.
लकी क्रमांक : १
|
|
पुरेसा आराम करा
मिथुन – तुमची प्रकृती उत्तम नसेल. डॉक्टरला दाखवून किंवा औषधे घ्यायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसाच्या उत्तरार्धात पुरेसा आराम करा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वोत्तम सप्ताह असेल. लकी क्रमांक : ८
|
|
तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल
कर्क – येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल. ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा / तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.
लकी क्रमांक : ३
|
|
मित्र दुखावला जाईल
सिंह – तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाइकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला, त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. व्यावसायिकांना चांगला सप्ताह अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल.
लकी क्रमांक : १
|
|
ताणतणाव शीघ्रकोपी बनवतील
कन्या – ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. मोठय़ा समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाला शीघ्रकोपी बनवतील आणि अविश्रांत काम करावे लागेल. तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुम्ही श्रंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.
लकी क्रमांक : ८
|
|
मदतीची अपेक्षा बाळगू नका
तूळ – घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. वडिलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दु:ख पोहोचवू शकते. पण तुम्ही शांतपणे सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून / जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम सप्ताह असेल.
लकी क्रमांक : २
|
|
आर्थिक अडचणींवर मात
वृश्चिक – तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली तर आवश्यकता भासल्यास प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. प्रभावी ठरणा-या आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. उद्योग-व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. गेल्या ब-याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण या सगळ्या तक्रारी दूर होतील. लकी क्रमांक : ४
|
|
जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा त्रास
धनु- तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव तशीच काहीशी असणार आहे. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल.
लकी क्रमांक : १
|
|
वादविवाद छेडू नका
मकर- आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवता येतात. प्रेमातील वेदना तुम्हाला झोपू देणार नाहीत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कणखर राहा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या इतर कुटुंबीयांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.
लकी क्रमांक : १
|
|
कामाच्या ठिकाणी कदाचित घोडचूक
कुंभ- तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खासगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करणे कमी केले नाही तर तुम्ही कामाच्या ठिकाणी कदाचित घोडचूक कराल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत; परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही.
लकी क्रमांक : ७
|
|
मार्ग फलदायी ठरेल
मीन – आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. कोणाशी आर्थिक व्यवहार करायचे याची काळजी घ्या. मुलांबरोबरील वादामुळे नैराश्य येईल. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग फलदायी ठरेल. मात्र, मुलाखतीदरम्यान आपल्या मनाची स्थिरता कायम ठेवून स्वत:ला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.
लकी क्रमांक : ५
|