बलात्काराच्या गुन्ह्यात गुरमीत राम रहीमला तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार?
नवी दिल्ली- बलात्काराच्या गुन्ह्यात गुरमीत राम रहीमला तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार? याविषयी विविध अंदाज बांधले जात होते. पण आता डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीकडून यासंबंधी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे वारसदाराचा वाद संपुष्टात येणार आहे. गुरमीत राम रहीम तुरुंगातूनच डे-याचा कारभार हाकणार असल्याची माहिती व्यवस्थापन समितीने दिली आहे.त्यामुळे तूर्तास तरी वारसदाराचा प्रश्न मिटला आहे. हनीप्रीत किंवा राम रहीमच्या मुलांपैकी कोणाचीही डे-याच्या प्रमुखपदी नियुक्ती होणार नाही.
राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार याविषयी बरीच चर्चा रंगली होती. काही जण हनीप्रीतचे नाव घेत होते. हनीप्रीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे, पण दोघांच्या संबंधांबद्दल बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. डे-याच्या प्रमुखपदी नव्या नियुक्तीचा सध्या कोणताही विचार नाही अशी माहिती विपासना इन्सानने दिली. त्या डे-याच्या व्यवस्थापन समितीच्या प्रमुख आहेत. डेरा समितीने हनीप्रीतबद्दल आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. हनीप्रीतचा डे-यामध्ये कोणताही हिस्सा नाही किंवा तिचा कोणताही संबंधही नाही. त्यामुळे हनीप्रीत डे-याची वारसदार होऊ शकत नाही.
[EPSB]
अबू सालेमला जन्मठेप तर दोन जणांना फाशी
[/EPSB]