पाटणा शहरातील बहादूरपूर भागात मंगळवारी सकाळी एका फ्लॅटमध्ये दोन जिवंत शक्तिशाली बॉम्ब सापडले.
पाटणा- पाटणा शहरातील बहादूरपूर भागात मंगळवारी सकाळी एका फ्लॅटमध्ये दोन जिवंत शक्तिशाली बॉम्ब सापडले.
पाटण्यात सोमवारी रात्री याच फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेच्या एका बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हे दोन बॉम्ब सापडले. पोलिसांनी बाँब विरोधक पथकाला बोलावून हे दोन्ही बॉम्ब निकामी केले.
पाटणा आणि बोध गया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाशी हे दोन्ही बॉम्ब मिळतेजुळते असल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.