मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘शामिताभ’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुंबई – मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘शामिताभ’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुंबईत या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मिळून ६० लाख रुपयांची कमाई केली. तर पूर्व पंजाबने या चित्रपटाने ३० लाख आणि म्हैसूरमध्ये या चित्रपटाने ३५ लाख रुपयांची कमाई केली आहे. आठवड्याभरात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवेल असे सांगण्यात येत आहे.
बिग बी अमिताभ बच्चन, तामिळ सुपरस्टार धनुष आणि कमल हसन यांची कन्या अक्षरा यांचा ‘शामिताभ’ हा चित्रपट सहा फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक आर.बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.