अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इक्बाल कासकर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इक्बाल कासकर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी आणि मारहाणीच्या गुन्ह्याखाली तीन फेब्रुवारील जे.जे. मार्ग पोलिसांनी इक्बाल आणि त्याच्या सहका-याला अटक केली होती.
काही दिवसांपूर्वी इस्टेट एजंट सलीम शेख यांनी इक्बाल आणि त्याच्या सहका-याविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. इक्बालने सलीम शेखकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ‘डांबरवाला बिल्डिंग’मध्ये बोलवून शेख यांना मारहाणही करण्यात आली होती. याप्रकऱणी तक्रार दाखल केल्यानंतर जे.जे.मार्ग पोलिसांनी मंगळवारी इक्बाल आणि त्याच्या साथीदाराला अटक कऱण्यात आली.
इक्बाल हा दाऊदचा पाचवा भाऊ आहे. सारा सहारा प्रकरणातील तो आरोपी असून २००३ मध्ये त्याला युनायटेड अरब अमिराती येथून भारतात आणले होते. यानंतर त्याला मोक्का कायद्याखाली अटकही झाली होती.