घर म्हटलं की घराची आणि घरातल्या माणसांची सुरक्षा आलीच. घराची आणि घरातल्या माणसांची सुरक्षा कशी घ्यायची, त्यासाठी आपल्या घरात काय तरतुदी असायला हव्यात किंवा काय केलं म्हणजे होणारे अपघात आपण टाळू शकू हे जाणून घेऊया.
इमारतीतील प्रत्येक मजल्यावर फायर एक्िंस्टग्विशर किंवा धूर (स्मोक) डिटेक्ट करेल अशी मशिन बसवावी.
झोपेतून उठून बसताना किंवा खाली बसलेले असताना उठताना नेहमी सावकाश उठावं. कारण अशावेळी पाय घसरण्याची शक्यता अधिक असते.
घरात म्हातारी माणसं असतील तर शक्यतो त्यांच्या वावरण्याच्या जागेतले सगळे अडथळे उदाहरणार्थ, रग किंवा इलेक्ट्रिक किंवा टेलिफोनच्या वायरी बाजूला कराव्यात.
- पाय घसरतील अशा फरशा बसवू नयेत.
- फरशीवर सांडलेलं पाणी त्वरित पुसून घ्यावं.
- खुर्चीवर चढणे शक्यतो टाळावेच.
घरात आणि घराबाहेर पाय-या असल्यास त्या पाय-यांच्या बाजूला धरायला रेलिंग अवश्य लावावं, म्हणजे पायरीवरून उतरताना घरातल्या वृद्ध माणसांना उतरणं सोपं जातं. इतकंच नव्हे तर पाय-यांवर लोखंडी पट्टय़ा लावून घ्याव्यात जेणेकरून पायही घसरत नाही.
घरात शंभर व्हॉल्टच्या किंवा फ्लोरोसंट बल्बचा वापर करावा. त्यांचा प्रकाश चांगला पडतो.
पाय-यांजवळच्या परिसरात प्रकाशयोजना व्यवस्थित असावी. जेणेकरून घरातल्या व्यक्तींना पाय-या व्यवस्थित दिसतील.
बाथरूम
रात्रीच्या वेळी बाथरूममधला लाइट चालू ठेवावा.
गिझरसारखी उपकरणं वर भिंतीवर असावीत. जेणेकरून त्यावर पाणी उडणार नाही.
बादल्या, टब आदी भांड्यांचा तळ सरकणारा नसावा.
बाथरूमबाहेर ठेवण्यात येणारं मॅट घसरणारं नसावं.
जास्त पाणी गरम घेऊ नये, कारण जास्त गरम पाण्यामुळे वाफेचे फोड येण्याची शक्यता अधिक असते.
गरम आणि थंड पाण्याचा नळ वेगळा असावा.
बाथरूमच्या दरवाजाला अशा पद्धतीने लॉक असावं जे दोन्ही बाजूंनी उघडता येतं.
लहान मुलांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी काही अपघात झाल्यास मदत मिळेल तेव्हाच अंघोळीला जावं.
किचन
किचनची जमीन नेहमी स्वच्छ ठेवावी. जमिनीवर कधीही पसारा ठेवू नये.
ओट्यावर नेहमीच प्रकाश येईल अशी योजना असावी.
फूडप्रोसेसर, मिक्सर, टोस्टर आदी उपकरणांवर ‘ऑन’ आणि ‘ऑफ’ या गोष्टी स्पष्ट दिसतील अशा मार्क कराव्यात.
धारदार सुरी किंवा चाकू या गोष्टी नेहमी जागेवर ठेवाव्यात किंवा त्यांची खास जागा निश्चित करावी.
चहाची किटली स्वयंचलित असावी म्हणजे नुकसान होत नाही.
अवजड सामान रिकाम्या पॅसेजमध्ये ठेवावीत.
धोकादायक वस्तू अन्नपदार्थापासून लांबच ठेवाव्यात.
जेवण तयार करताना गॅसजवळ उभं राहावं लागतं, त्यामुळे अंगावर ढगळ किंवा सिल्कचे कपडे घालणं टाळावं.
आपल्याकडे असलेल्या विविध मसाले किंवा अन्य पदार्थाच्या एक्स्पायरी डेट्स तपासून घ्याव्यात.