गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली- गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा ८५ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी १७५ भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ९४ व्या स्थानावर होता. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले असून भारताने यावर्षी नऊ देशांना मागे टाकल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया (टीआयआय) या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आहे.
डेन्मार्कने ९२ गुण मिळवून या देशाने सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सर्वाधिक भ्रष्टाचार उत्तर कोरिया आणि सोमालिया मध्ये होत असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. या देशांना अवघे आठ गुण मिळाले.
भारताचा शेजारी राष्ट्र चीन गेल्यावर्षी ८०व्या स्थानावर होता. तो चीन यावर्षी १०० व्या क्रमांकावर पोहचला आहे. भ्रष्ट देशांच्या यादीत भारत आणि श्रीलंका हे देश ३८ गुण मिळवून ८५ व्या क्रमांकावर आहेत. भारताने मागच्या वर्षी ३६ गुण मिळवले होते. त्यात यावर्षी दोन गुणांनी वाढ झाली आहे.
या यादीत पाकिस्तान आणि नेपाळ १२६, बांग्लादेश १४५, अफगाणिस्तान १७२, ब्राझील ६९, भूतान ३०, अमेरिका १७, युनायटेड किंगडम १७ व्या स्थानावर आहे.
डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झर्लंड, सिंगापूर, नेदरलँड, लक्झमबर्ग आणि कॅनडा या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार आहे. तर सोमालिया, उत्तर कोरिया, सूदान, अफगाणिस्तान, दक्षिण सुदान या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे टीआयआयने म्हटले आहे.