गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाची घोषणा करा असा सल्ला आम आदमी पक्षाने भाजपला दिला आहे.
पणजी- अजूनही वेळ गेलेली नाही, पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाची घोषणा करा असा सल्ला आम आदमी पक्षाने भाजपला दिला आहे.
भाजपला आपली चुक सुधारण्याची संधी आहे. त्यांनी मोदींच्या ऐवजी पर्रिकर यांच्या नावाची घोषणा करावी असे आपचे नेते दिनेश वाघेला यांनी म्हटले आहे.
त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपवर टीका केली.