भारत दौ-याला तीव्र विरोध झाल्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याने भारत दौरा रद्द केला आहे.
नवी दिल्ली- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याने भारत दौरा रद्द केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दिल्लीत ६ जानेवारीला होणारी वनडे लढत पहाण्यासाठी तो येणार होता. मात्र त्याच्या भारत दौ-याला तीव्र विरोध झाल्याने त्याने आपला दौराच रद्द केला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दिल्लीत होणा-या तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पहाण्यासाठी भारत सरकारने मियाँदादला व्हिसा मंजूर केला होता. मात्र व्हिसा देण्यास काँग्रेस आणि शिवसेनेने विरोध केला. मियांदाद देशाचा शत्रु असलेल्या दाऊदचा व्याही आहे. त्यामुळे दाऊदच्या नातेवाईकाला व्हिसा देणे म्हणजे देशातील जनतेच्या भावनांशी खेळ करण्यासारखे होईल असे काँग्रेसचे प्रवक्ता जगदंबिका पाल यांनी म्हटले आहे.
जावेद मियाँदादचा मुलगा जुनैद याचा विवाह कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची मुलगी माहरुख हिच्याशी झालेला असल्यामुळे मियाँदादच्या भारत दौ-याला सर्वांनी तीव्र विरोध दर्शवला. मात्र मियाँदादला व्हिसा मंजूर केल्यामुळे शिवसेना व भारतीय जनता पक्षासह काही राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मियाँदादला देशात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.