यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे वरिष्ठ न्यायाधीश अनुप दिगंबर जावळकर यांनी रविवारी सकाळी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे वरिष्ठ न्यायाधीश अनुप दिगंबर जावळकर यांनी रविवारी सकाळी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
जावळकर यांची काही दिवसांपूर्वी दारव्हा येथे बदली झाली होती. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
शनिवारी एका लग्नसमारंभासाठी यवतमाळला गेले होते. भ्रमणध्वनी घरीच ठेवून मध्यरात्री गाडी घेऊन ते घराबाहेर पडले. त्यानंतर रविवारी पहाटे मांजरखेडनजीक रेल्वे रुळावर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.