महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. इंग्रजी पाट्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक करुन इंग्रजी बॅनर्स फाडून टाकले. कांदिवलीमध्ये बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
कांदिवलीमध्ये बुधवारी सकाळी मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या हातात मनसेचे झेंडे होते. मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांवर दगडफेक केली आणि काही इंग्रजी बॅनरही फाडले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण होते. काही दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मनसेने पक्षस्थापनेपासूनच मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केली होती. आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे.
अगदी काही महिन्यांवर मुंबई महापालिकेच्या निवडणूका आला असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असावी, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.