जेएनयूमधील कन्हैया कुमारने देशाविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावे नसल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने पीटीआयला दिल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली- देशद्रोहाच्या गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) कन्हैया कुमारने देशाविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावे नसल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने पीटीआयला दिल्याचे वृत्त आहे.
कन्हैय्याची पोलीस कोठडी संपणार असून त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. कन्हैया कुमार हा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे.
संसदेतील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याला देण्यात आलेल्या फाशीच्या निमित्ताने एका आयोजित कार्यक्रमात तो उपस्थित होता.
मात्र, त्याने कोणतेही देशविरोधी नारे लगावले नाहीत, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी पीटीआयला दिली. मात्र, अतिउत्साहात दिल्ली पोलिसांनी त्यावर देशद्रोहाचा खटला भरला, असे पीटीआयचे वृत्त आहे.
‘जेएनयुमधील प्रकाराला हफीझ सईदचा पाठिंबा’
[EPSB]
‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष अटकेत
संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याला फाशी दिल्याच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणा-या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हेय्या कुमारला पोलिसांनी अटक केली आहे.
‘जेएनयु’तील देशद्रोही विद्यार्थ्यांना गोळ्या घाला’
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयु) भारत विरोधी घोषणा देणा-या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे परखड मत भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
गिलानी यांना पोलीस कोठडी
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एस. ए. आर. गिलानी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
[/EPSB]