बॉलिवूड अभिनेता अमीर खान आता राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या.
मुंबई- असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून टिकेचा धनी झालेला बॉलिवूड अभिनेता अमिर खान आता राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होणार आहे, अशी चर्चा सुरू होती.
१३ फेब्रुवारीला ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या सहभोजन कार्यक्रमात मोदींची अमिरबरोबर भेट झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांशी अमिरबरोबर चर्चा झाली. त्यावेळी अमिरने जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्यास होकार दिला, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे अमिर जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर होणार असल्याचे बोले जात होते.
मुख्यमंत्री बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा करणार होते. मात्र त्यांनी याबाबात काहीही सांगितले नाही.
उद्योग विभागाने तयार केलेल्या चित्रफितीमध्ये अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी योगदान दिले आहे. आता जलयुक्त शिवार योजनेसाठी अमिर खान काम करणार आहे.
देशात असहिष्णुता वाढत असून त्यामुळे अमिरच्या पत्नीने देश सोडून जाण्याची भीती बोलून दाखवली, असे वक्तव्य केल्यावर टीकेची झोड उठल्यामुळे अमिरने स्पष्टीकरणही दिले होते.