पाच टप्प्यांमध्ये होणा-या बिहार विधानसभा निवडणुकीत तिस-या आणि महत्वाच्या टप्प्यात ५३ टक्के मतदान झाले.
पाटणा- पाच टप्प्यांमध्ये होणा-या बिहार विधानसभा निवडणुकीत तिस-या आणि महत्वाच्या टप्प्यात ५३.३२ टक्के मतदान झाले.
बक्सरमध्ये ५६.५८ टक्के मतदान तर पटनामध्ये ५१.८२ टक्के मतदान झाले. सारन ५२.५० टक्के, वैशाली ५४.८२ टक्के मतदान तर नालंदा येथे ५४.११ टक्के मतदान झाले.
तिस-या टप्प्यात एकूण ५० जागा असून, सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पाटणा, वैशाली, सारन, नालंदा, बक्सर आणि भोजपूर या सहा जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. यासाठी एकूण १४,१७० मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव दहा मतदारसंघात दुपारी चार तर, उर्वरित ४० मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपवण्यात आली.
एकूण ८०८ उमेदवार रिंगणात असून, त्यात ७१ महिला उमेदवार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची दोन मुले तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव अनुक्रमे महुआ आणि राघोपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.