जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेआहेत, अशी माहिती पोलीस अधिका-यांनी दिली.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/08/encounter1.jpg)
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेआहेत, अशी माहिती पोलीस अधिका-यांनी दिली.
सोपोरमधील बोमाई भागात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.
त्यांना प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. हे कारवाई थांबवल्यानंतर सुरक्षा दलांवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली.