निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एक आठवड्याची मुदत मागितली आहे.
नवी दिल्ली- मुजफ्फरनगर दंगल आणि भाजप विरोधात केलेल्या कथित वादग्रस्त विधानाबद्दल निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एक आठवड्याची मुदत मागितली आहे.
मुजफ्फरनगर दंगल पीडित तरुणांच्या संपर्कात ‘आयएसआय’ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केले होते. तसेच भाजप द्वेषाचे राजकारण करत असून यामुळे दंगली भडकतात,असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.
यावर आक्षेप घेत भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. भाजपच्या या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.