कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेणा जलाशयात बोट उलटल्याने नागपूरचे ११ विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली.
नागपूर- कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेणा जलाशयात बोट उलटल्याने नागपूरचे ११ विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली. हा अपघात रविवारी रात्री घडला. तीन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे तर एकाचा मृतदेह सापडला.
रविवार असल्याने नागपूरमधील ११ विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वेणा जलाशयावर गेले होते. या सर्वांनी बोटींग करण्याचे ठरवले. सर्वजण एकत्र गेल्याने बोटीमध्ये अधिक वजन झाल्याने बोट उलटली. यामध्ये सर्व विद्यार्थी पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच शोध मोहिम सुरू करण्यात आली. यामध्ये अतुल बावणे, रोशन दोरके, अमोल दोरके यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. राहुल जाधव याचा मृत्यू झाला. अंधार झाल्याने शोध मोहिम थांबवली. सोमवार सकाळपासून बाकीच्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
बोटीत बसल्यानंतर या तरुणांनी फेसबुक लाइव्ह करत होते. आपण करत असलेली मज्जा आपल्या डिजीटल फ्रेण्डसला व्हिडीओ मार्फत दाखवली. त्यात त्यांनी आपण मस्त बोटींगचा आनंद घेत आहोत पण आपल्यापैकी कुणालाच पोहता येत नसल्याचेही सांगितलं. मात्र फेसबुक लाइव्ह व्हिडीओ सुरु असतानाच ही बोट बुडाल्याचे समजते.