ॐ काराला फक्त शब्द म्हणणे म्हणजे हिमालयाला टेकडी म्हणण्यासारखे आहे. खरंतर अवकाश-आकाश-पृथ्वी-पाताळ व्यापूनही उरलेला असा ॐ हा ध्वनी आहे. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक शुभकार्य ॐ शिवाय सुरू होत नाही.
ॐकाराचे अनेकांना अनेक अर्थ जाणवत असतील, पण यातील हा एक दृष्टिकोनही समजून घेतला पाहिजे.
अ कार, उ कार आणि म कारापासून तयार झालेला ॐ हा ध्वनी जगातील सर्व भाषांचा आत्मा आहे, असं म्हणता येईल. अ, उ, व म ही तीन अक्षरे भाषेतील स्वर, व्यंजने व अनुस्वार यांचे प्रतिनिधित्व करतात आणि स्वर, व्यंजने व अनुस्वाराशिवाय कोणतीही ग्रंथ निर्मिती-म्हणजेच ज्ञान निर्मिती-अशक्य आहे हाच त्याचा अर्थ.
हिंदू तत्त्वज्ञानानुसार ॐकाराचे अस्तित्व आपले अवघे जीवन व्यापून राहिले आहे. तान्ह्या बाळाच्या तोंडून आपल्या आई-वडिलांना बघून निघणारा अस्फूट हुंकार हा ॐचाच सहज सुंदर आविष्कार आहे, त्याचप्रमाणे वेदनेनं विव्हळत असता तोंडून निघणारा अं.. अं उद्गारदेखील ॐचेच करुण रूप.
आनंदाच्या भरात आपल्या तोंडून निघणारा ‘ओहो..!’ आणि दु:खात येणारा ‘ओह.!’ हे ॐचेच आविष्कार आहेत. इतकेच काय, मराठी बायको आपल्या नव-याला ‘अहो’ अशी जी (प्रेमाने वा रागाने) हाक मारते, हे ॐचेच एक रूप आहे.
ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेचा समारोप ‘आमेन’ने होतो, तर इस्लाम धर्मीय त्यांची प्रार्थना आमीनने संपवतात.. ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर ओमेगा हे आहे.. ही सर्व ॐचीच रूपे आहेत, असे म्हणतात.
उडिया भाषेतील शब्द औ चा अर्थ आत्मा असा असून या शब्दापासून ॐ शब्द निर्माण झाला, असे अनेक भाषा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ज्यू धर्मीयांचा अत्यंत पवित्र असा योम किप्पूर हा सण आणि पारसी धर्मीयांतील अहोम हा सर्वात पवित्र देव. यात पण ॐ आहे. योम आणि अहोम या दोन्ही शब्दांचा उच्चार ॐ सारखाच आहे, हे आपल्यालादेखील पटेल.
अहोम हा पारसी शब्द आपल्या सोमचा आविष्कार आहे. स या अक्षराचा उच्चार हिंदुस्थान बाहेरील लोक ह असा करतात. म्हणून तर सिंधूचे हिंदू झाले आणि सर्पीस, ज्या आजाराला आपण नागीण म्हणतो त्याचे हर्पिस झाले. अशाच प्रकारे सोमचे अहोम झाले आणि सोम म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर ज्यांचा ॐ चा संबंध आपल्या सर्वानाच ठाऊक आहे.!
ओम उच्चारणे फक्त धार्मिक नाही, तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रोज फक्त पाच मिनिटे ओम उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.
कसे करावे ओम उच्चारण?
ओम उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा. या काळात पूर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल, याचा प्रयत्न करा. जर ओम उच्चारण करताना कान बंद करता आले, तर यापेक्षा जास्त फायदा होईल.
ओमकार जपाचे महत्त्व आणि परिणाम :
- मानवी मनाची शुद्धता करणे.
- मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.
- मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.
- शारीरिकदृष्टय़ा, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव-भावनांवर नियंत्रण आणणे.
- ओमकार जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होऊन, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.
ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण
हिंदू धर्मात ओंकाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अप्रू्ण वाटतात; परंतु धार्मिक महत्त्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्त्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात.
तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
थायरॉईड : ओंकाराचा उच्चार केल्याने, गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो.
अस्वस्थता : तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर, डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा.
तणाव : यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.
रक्तप्रवाह : यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
पचन : ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते.
स्फूर्ती : ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.
थकवा : थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही.
झोप : ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे.
फुप्फुस : ओंकाराच्या उच्चाराने फुप्फुसाचे कार्य सुधारते.
पाठीचा कणा : ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात.
(माहिती संदर्भ : आंतरजाल)