हिमाचल प्रदेशमध्ये मंडी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहे.
मंडी – हिमाचल प्रदेशमध्ये मंडी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी आणि दरडी कोसळल्याच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहे.
शुक्रवारी रात्रीपासून हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. त्यामुळे कुलू, मनाली, शिमल आणि मंडी या भागांमध्ये पाणी साचले आहे.
ढगफुटीमुळे जिल्ह्यातील धरमपूर बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामध्ये चार बसेसही वाहून गेल्या आहेत. या बसेसमध्ये प्रवासी नव्हते. तर सहा जण बस स्थानकात अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे जवळच्या गावातील दोन घरे कोसळण्याचीही दुर्घटना घडली.