हिमाचल प्रदेशातील कांग्रा, शिमला आणि चंबा या जिल्ह्यांना गुरुवारी मध्यम स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/08/earthquake-symbolic.jpg)
शिमला – हिमाचल प्रदेशातील कांग्रा, शिमला आणि चंबा या जिल्ह्यांना गुरुवारी मध्यम स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला.
दुपारी १.४१ मिनिटाच्या सुमारास हा भूकंप झाला. ५.२ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. हिमाचल प्रदेशाच्या चंबा-कांग्रा सीमजवळ या भूकंपाचे केंद्रबिंदू होते.
भूकंपाचा धक्का मध्यम स्वरुपाचा असल्याकारणाने यामध्ये कोणतीही जिवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे हादरे जाणवायला सुरुवात झाल्यानंतर लगेचच पालपूर जिल्ह्यातील तसेच कांग्रा आणि मंडी जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शाळेतील मुलांनी घाबरुन रस्त्यांवर धाव घेतली.