हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी रविवारी मतदान होणार आहे.
सिमला- हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी रविवारी मतदान होणार आहे. विधानसभेसाठी ६८ जागांसाठी काँग्रेस व भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर बसपनेही ६६ जागा उमेदवार उभे केले आहेत.
याव्यतिरिक्त हिमाचल लोकहित पक्ष ३६, तृणमूल काँग्रेस २५, सप १६, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १५, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमान पक्ष (प्रत्येकी १२), भारतीय कम्युनिस्ट पक्ष सात, शिवसेना चार व १०५ अपक्ष अशा एकूण ४५९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होणार आहे.
निवडणुकीच्या रिंगणात एकूण २७ महिला उमेदवारांचा समावेश आहे. मतदानासाठी राज्यात सुमारे सात हजार २५३ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे.