नाना पाटेकरांच्या अस्सल अभिनयाने रंगलेल्या `नटसम्राट’ हा चित्रपट आता लवकरच हिंदीत प्रदर्शित होणार आहे.
मुंबई – नाना पाटेकरांच्या अस्सल अभिनयाने रंगलेल्या `नटसम्राट’ हा चित्रपट आता लवकरच हिंदीत प्रदर्शित होणार आहे. नाना आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन बेलवलकरांच्या मित्राच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
हिंदीतल्या `नटसम्राट’ चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकरांनी घेतली आहे. हिंदी चित्रपटात बेलवलकरांच्या मित्राच्या भूमिकेत अमिताभ बच्चन पहायला मिळणार आहे.
पहिल्या दिवसापासून या चित्रपटाचे सर्व शो चित्रपटगृहात हाऊस फुल चालले तर ४०० पेक्षा जास्त चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला गेला. पहिल्या तीन दिवसातच १० कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘नटसम्राट’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.