अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे.
अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे. या सर्व समस्यांचा सामना अगदी झोपडीपासून गगनचुंबी इमारतींपर्यंत कुठेही राहणाऱ्या मुंबईकरांना करावा लागतोच. त्याविषयी कुरबुर करणे, आपसात चर्चा करून महापालिका किंवा संबंधित संस्थेला दूषणे देणे किंवा फार तर तक्रार नोंदवणे यापलीकडे काही केले जात नाही. या तक्रारींची दखल घेतली जाईलच, याचीही शाश्वती नसते. त्यामुळेच ‘प्रहार’ने वाचकांसाठी हे खास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या समस्या तुम्ही इथे मांडल्यास आणि संबंधित छायाचित्रेही सोबत जोडल्यास त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
संपर्क : प्रहार कार्यालय, इंडियाबुल्स वन सेंटर, ज्युपिटर मिल्स कंपाउंड, फितवाला रोड, लोअर परळ, मुंबई- १३, फॅक्स : ०२२-४०९६९९००
ई-मेल : prahaar.complaint@prahaar.co.in
वडाळा पूर्वेकडील स्कायवॉक अनेक महिन्यांपासून अंधारातच आहे. लाखो रुपये खर्च करून हा स्कायवॉक उभारल्यानंतर वीज दिवे लावण्यात आले होते. मात्र, हे दिवे नादुरुस्त झाल्यापासून बदलण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळेत पुलावर काळोख असल्यामुळे भिकारी, गर्द पिणारे या स्कायवॉकचा ताबा घेतात. ही समस्या छायाचित्रातून पाठवली आहे ‘प्रहार’चे वाचक विशाल विठ्ठल परुळेकर यांनी.