सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या संदर्भातील आरोपांच्या बातम्या प्रसिध्द तसेच प्रक्षेपित करायला दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या संदर्भातील आरोपांच्या बातम्या प्रसिध्द तसेच प्रक्षेपित करायला दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. एका माजी प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने स्वतंत्र कुमार यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
न्यायमूर्ती मनमोहन यांनी आपल्या अंतरिम आदेशात प्रसारमाध्यमांनी स्वतंत्र कुमार यांच्या संदर्भातील आरोपांच्या बातम्या प्रसिध्द करु नये तसेच त्यांच्या छायाचित्राचा वापरु नये असे म्हटले आहे.
इंटरनेटवरील स्वतंत्र कुमार यांचे छायाचित्र काढून टाकण्याचेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे. स्वतंत्र कुमार यांनी राष्ट्रीय स्तरावरील एक वर्तमानपत्र, दोन वृत्तवाहिन्या आणि माजी प्रशिक्षणार्थी महिला वकिलाविरुध्द अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.