प्रस्तावित स्मार्ट सिटीमध्ये समावेश असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्मार्ट सिटीसाठी थेट नागरिकांकडूनच अभिप्राय मागवले होते.
कल्याण- प्रस्तावित स्मार्ट सिटीमध्ये समावेश असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्मार्ट सिटीसाठी थेट नागरिकांकडूनच अभिप्राय मागवले होते. यासाठी पालिकेने काही महत्त्वाच्या जागी स्टॉल्स उभारले होते.
फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातूनही नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांच्या आधारेच स्मार्ट सिटी आरखडा तयार करण्यात येणार आहे. २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हे अभिप्राय जनतेकडून मागवण्यात आले होते.
या व्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील विविध मान्यवर, तज्ज्ञ, सामाजिक संघटना, विद्यार्थी व नागरिकांच्या चर्चासत्राचे, निबंध स्पर्धा लोगो डिझाईन स्पर्धा या माध्यमातूनही स्मार्ट सिटीच्या सूचना मागवल्या होत्या. या सूचनांसाठी पालिकेने कल्याण पूर्व व पश्चिम, डोंबिवली पूर्व व पश्चिम तसेच टिटवाळा रेल्वे स्थानकांबाहेर अभिप्रायाचे बूथ उभारले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.