स्पॅनिश एरअलाइनचा विमानतळ नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संवादच न झाल्यामुळे विमान अपहृत असल्याची शंका आली.
अॅमस्टरडॅम- स्पॅनिश एअलाइनचा वैमानिक आणि अॅमस्टरडॅममधील शिपोल विमानतळ नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संवादच न झाल्यामुळे विमानतळावरील अधिका-यांना उतरणारे विमान अपहृत असल्याची शंका आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी दोन एफ-16 लढाऊ विमाने तैनात केली. मात्र हे विमान अपहृत झाले नसल्याचे स्पष्ट झाले.