विजयनगरच्या साम्राज्याच्या अवशेषातही काही आढळले नाही. याचा अर्थ आपल्याकडे पक्षी-शी-सौंदर्यवर्धकाबद्दलचे अज्ञान होते हे आपणासकट साऱ्यांनीच मान्य करायला हवं. असो, सगळयांनाच सारंच काही ठाऊक असायला हवं हा काही नियम नाही. त्यात वावगंसुद्धा नाही. शिवाय इंडियन्सची खात्री ही अमेरिकेतील पुराव्यांवर जास्त बसते.
घाईघाईत निघालोय, देवीच्या देवळात दर्शनाला नि रस्त्यावरच्या झाडाखालून जात असताना कावळेराव, चिमणीताई किंवा कबुतरभाऊ आपल्या डोक्यावर पचकले किंवा शिटले तर आपला चेहरा कसा बघण्यासारखा होतो. पाच पन्नास शिव्या आपल्या मुखी येऊन जातात. त्या गरीब बिच्चा-या पक्षीगणांसाठी आपण निर्मल स्वच्छतागृह अभियान राबविलेले नाही.
तसंच त्यांना कुठे, कधी आणि किती वाजता शी वुईथ सू (शी-व-सू) करायची याचेही प्रशिक्षण दिले नाही. हा आपला दोष आपण २०१६ सालीही लक्षात घेत नाही. पक्ष्यांची अशी अवचित अंगा-खांद्यावर पडणारी शी, झाडाखाली पडलेली शी ही आपल्यासाठी शिव शिव किंवा हर हर करणारी असते. आपणास कधीच दयाबुद्धीने त्याकडे बघता येत नाही. स्थितप्रज्ञालाच ते शक्य आहे.
शी-व-सू, म्हणजे ई बया घाण, ही आपल्या डोक्यातली फिट्ट संकल्पना काही केल्या जात नाही. कारण पाच-पंचवीस हजार वर्षापासूनची तशीच या भूमीची शिकवण. पण ही संकल्पना आता बदलण्याची सुवर्णसंधी कोणत्याही क्षणी आपल्या दारी येऊ शकते. शी-व-सू, सुद्धा वा वा! आणि अरे वा क्या बात है, असं म्हणवणारी असू शकतेच याची खात्री आपणास पटू शकते. कारण त्या दूरवरच्या देशी म्हणजेच समस्त इंडियन्ससाठी आदर्शवत असणा-या अमेरिकेत पक्ष्यांची शी-व-सू, सध्या आदरणीय झाली आहे. कारण तेथील सुंदर ललनांच्या सौंदर्याला हजारेक चाँद-तारे आणि उपग्रह लावण्याचे अत्युत्तम टॉनिक या शी-व-सूमध्ये असल्याचं अधिकृतपणे जाहीरही झालंय.
हॉलिवूडच्या तारका या १६ ते ६६ वर्षापर्यंत (मिस कम मिसेस मॅडोना वय र्वष ५० प्लस, मिसेस निकोल किडमन वय र्वष ४२ प्लस, कधी मिस आणि कधीतरी मिसेस जेनिफर ऑस्टिन वय र्वष ४० प्लस, मिसेस अँजेलिना ज्योली वय र्वष ४० प्लस, बराच काळ मिसेस आणि सध्या मिस असेलेल्या डेमी मूर वय र्वष ५०, मिस जेनिफर लोपेझ -४० र्वष, मिस केट विंनस्लेट ४० वर्ष, मिस शेरॉन स्टोन ५० प्लस. इत्यादी अनादी.) कायम हॉट-मादक आणि धकधक वाढवणा-याच का असतात याचं रहस्य पक्ष्यांच्या या शी-व-सूमध्ये दडलेलं असतं.
त्यांच्या चंद्रासारख्या साजि-या गोजि-या मुखडय़ावर त्या या शी-व-सूने तयार केलेला ब्युटी फेसपॅक लावतात. पक्ष्यांच्या शी-व-सूची ही शक्ती अथवा अज्ञात महती आपल्याकडील पक्षीतज्ज्ञांना का बरे एव्हाना ज्ञात झाली नसेल, हा गहन प्रश्न आहे. आपल्याकडे अनंत काळापासून सारेच काही म्हणजेच उपग्रह ते अग्निबाण ते टाईमबॉम्ब ते विमान इत्यादी असल्याचे आपला दावा उभ्या जगाशी आहेच. पण शी-व-सू सौंदर्यवृद्धी शक्तीचा दावा अद्यापतरी एकाही ऐतिहासिक साधनांच्या अभ्यासकांनी केलेला नाही.
चीनच्या कोणत्यातरी प्रांतातून निघून थेट चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरानामे तहसील असणा-या माणिक गढनामे गावी पोहोचला. त्याने ब-याच बारीक बारीक गोष्टी आपल्या प्रवासवर्णनात लिहिल्या. पण त्यालाही असं काही आढळून आले नाही. बाबराने तुझुक ई बाबरी किंवा असंच काहीतरी आत्मचरित्र तिकडे उत्तरेत लिहिले, पश्चिमेत गाथासप्तशती लिहिली गेली, कर्नाटकात लढाया करत असतानाच टिपू सुलतान डायरी लिहायचा, पण त्यातही याबद्दल अ का ढ नाही.
विजयनगरच्या साम्राज्याच्या अवशेषातही काही आढळले नाही. याचा अर्थ आपल्याकडे पक्षी-शी-सौंदर्यवर्धकाबद्दलचे अज्ञान होते हे आपणासकट साऱ्यांनीच मान्य करायला हवं. असो, सगळयांनाच सारंच काही ठाऊक असायला हवं हा काही नियम नाही. त्यात वावगंसुद्धा नाही. शिवाय इंडियन्सची खात्री ही अमेरिकेतील पुराव्यांवर जास्त बसते.
त्यामुळे पक्षी-शी-सौंदर्यशक्तीची महती ते आता इकडे चटकन स्वीकारतील नि इंडियन्स वुमेन सुद्धा ही नवी सौंदर्यघुटी आपल्या मुखचंद्रमेला लावून आणखी सौंदर्यशाली होतील.. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडील ३५ ते ४० प्लसपासून पुढे असणा-या सौंदर्यवतींच्या सौंदर्याचा गुलाब हा कायमच टवटवीत असलेला आपणास दिसत राहील.
तेव्हा आता तरी पदरी पडले नि पवित्र झाले या म्हणीच्या धर्तीवरच पक्षी-शी-डोक्यावर, शर्टावर पडल्यावर आरस्पानी सौंदर्याचं गुपित आम्हासही भेटले. असं म्हणत आनंदानं कोणताही किंतु-परंतु न ठेवता दर्शनमात्रे करू.