काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी छत्तीसगडमध्ये जाऊन नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या काँग्रेस नेत्यांची चौकशी केली.
रायपूर – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी छत्तीसगडमध्ये जाऊन नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या काँग्रेस नेत्यांची चौकशी केली. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर शनिवारी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांसह २७ जण गंभीर जखमी झाले.
या घटनेत मृत्यूमूखी पडलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस भवनात श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते जखमींची विचारपूस करण्यासाठी जगदलपूर येथे दाखल झाले, अशी माहिती काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने दिली. नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या विद्याचरण शुक्ल यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी गुडगाव येथे हलवण्यात आले आहे. तत्पूर्वी, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्या कुटुंबियांची देवेंद्रनगर येथे जाऊन भेट घेतली.
[EPSB]
परिवर्तन यात्रा : नंदकुमार पटेलांची हत्या »
काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्यात माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश याची नक्षलवाद्यांनी हत्या केली आली आहे.…
[/EPSB]