प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना कुठलीही दया-माया न दाखवणारा भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाने आज कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केले.
मुंबई – प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना कुठलीही दया-माया न दाखवणारा भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाने आज कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केले. इंग्लंड विरुध्दचा आजचा त्याचा शंभरावा कसोटी सामना ठरला.
कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण करणारा सेहवाग ९ वा भारतीय क्रिकेटपटू आहे. ३४ वर्षीय सेहवागने आतापर्यंतच्या कसोटी कारर्किदीत ५०.८९ च्या सरासरीने ८,४४८ धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमधील त्याचा ८२. ४५ चा स्ट्राईक रेट एकदिवसीय क्रिकेटला साजेसा आहे. १२ वर्षात सेहवागच्या खात्यात २३ कसोटी शतके जमा आहेत. याच चार व्दिशतके आणि दोन त्रिशतकांचा समावेश आहे. कसोटीमध्ये ३१९ त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मार्च २००८ मध्ये चैन्नई येथे दक्षिणअफ्रिकेविरुध्द त्याने ही खेळी केली साकारली होती.
सेहवागचा आता सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि सौरव गांगुली यांच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे.