सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांच्या पाठोपाठ शनिवारी सेन्सॉर बोर्डाच्या अन्य सदस्यांनीही राजीनामा दिला.
नवी दिल्ली- सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांच्या पाठोपाठ शनिवारी सेन्सॉर बोर्डाच्या अन्य सदस्यांनीही राजीनामा दिला.
सॅमसन यांच्या राजीनाम्यानंतर इरा भास्कर यांनीही शुक्रवारी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यात आणखी सात सदस्यांनी सॅमसन यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याचा निर्णय घेतला. यात पंकज शर्मा, राजीव मसंद, शाजी करूण, शुभ्रा गुप्ता, लोरा प्रभू, शेखरबाबू कंचोला व टीजी थायगराजन यांचा समावेश आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित बाबा राम रहीम सिंग यांच्या ‘मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीस दिलेल्या मंजुरीवरून हा वाद सुरू झाला आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या आणखी एका सदस्याचा राजीनामा
सेन्सॉर बोर्डात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेले सदस्य आणि अधिकारी संगनमत करीत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप सॅमसन यांनी केला आहे. तसेच ते सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याने काम करणे कठीण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य इरा भास्कर यांनीही मंडळाच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त करत शुक्रवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी सकाळी बोर्डाच्या अन्य सात सदस्यांनीही सामूहिक राजीनामा देत सॅमसन यांना पाठिंबा दिला.