दोन महिन्यातील सर्वात नीचांकी पातळी गाठल्यावर बुधवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स किंचित तेजी दाखवत १७ अंशांनी किरकोळ वधारला.
मुंबई- दोन महिन्यातील सर्वात नीचांकी पातळी गाठल्यावर बुधवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स किंचित तेजी दाखवत १७ अंशांनी किरकोळ वधारला.
बाजार सकारात्मक पातळीवर सुरू झाला होता परंतु दिवसभर किरकोळ हेलकाव्यांमध्येच अस्थिर राहिला. दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात २४,९७८.८६ वर सुरू झालेला सेन्सेक्स अखेर २४,९००.६३वर बंद झाला.
मंगळवारी सेन्सेक्स ५१६ अंशांनी कोसळला होता. निफ्टी निर्देशांकही ११ अंशांनी वधारून ७,६१४.३५ वर बंद झाला. टाटा स्टीलचा सर्वाधिक फायदा होऊन त्यांचे समभाग ५.२५ टक्क्य़ांनी चढले.