भारतीय बाजारपेठेत स्वस्तातल्या स्मार्टफोनला मोठी पसंती मिळत असून कोरियन कंपनी सॅमसंगने ती आतापर्यंत पूर्ण केली. म्हणूनच वर्चस्व राखण्यात सॅमसंगला यश आले आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून भारतीय कंपन्यांनी या बाजारपेठेत चुरस निर्माण झाली आहे. यात गुगलच्या ‘अँड्रॉइड वन’ने उडी घेतल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
विकसनशील देशांत स्मार्टफोनला चांगली मागणी असली तरी अजून विस्ताराला बरीच जागा शिल्लक आहे. किमतीबाबत अतिसंवेदनशील भारतीय बाजारपेठेत स्वस्तातल्या स्मार्टफोनला मोठी पसंती मिळत असून कोरियन कंपनी सॅमसंगने ती आतापर्यंत पूर्ण केली. म्हणूनच वर्चस्व राखण्यात सॅमसंगला यश आले आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून भारतीय कंपन्यांनी या बाजारपेठेत चुरस निर्माण झाली आहे. यात गुगलच्या ‘अँड्रॉइड वन’ने उडी घेतल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
भारतीय मोबाइल बाजारपेठेवरील नोकियाचे वर्चस्व मोडीत काढत सॅमसंगने काही वर्षापूर्वी अव्वल स्थानी झेप घेतली. मात्र स्वस्त मोबाइलच्या या स्पध्रेत भारतीय कंपन्यांच्या नावीन्यपूर्ण आणि स्पर्धात्मक किमतींमुळे सॅमसंगची दमछाक होऊ लागली आहे. एप्रिल-जून तिमाहीत तर भारतीय बाजारपेठेत सॅमसंगला मायक्रोमॅक्सने अव्वल स्थानावरून खाली खेचण्याची करामत केली. स्मार्टफोन पुरवठयाच्या बाबतीत अव्वल क्रमांक कायम असला तरी ‘अँड्रॉइड वन’ या गुगलच्या आक्रमक रणनीतीमुळे त्यावर सॅमसंगची पकड किती टिकून राहते हे पाहणे रंजक ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील बरीचशी लोकसंख्या स्मार्टफोनपासून वंचित आहे. यासाठी ‘अँड्रॉइड वन’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेसह उतरताना १०० कोटी नवे स्मार्टफोनधारक जोडण्याचे लक्ष्य गुगलने डोळयासमोर ठेवले आहे. मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाइस यांसारख्या भारतीय कंपन्या स्वस्त स्मार्टफोनच्या बाजारपेठेत झपाटयाने वाढत आहेत. अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अँड्रॉइड ४.४ किटकॅट ही नवी आवृत्ती दाखल केली. स्वस्त फोनमधील हार्डवेअरवरही ‘किटकॅट’ चांगला अनुभव देत असून स्वस्त फोनमधील स्पर्धेत मोठी वाढ झाली आहे. अँड्रॉइड वन हे त्यापुढील पाऊल आहे. फीचर फोनकडून स्मार्टफोनकडे वळणा-या ग्राहकांकडून स्वस्त फोनला प्राधान्य दिले जात आहे. कमी किमतीतले स्मार्टफोन उत्पादकांकडून किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ५१२ एमबी मेमरीची मर्यादा पाळली जाते. यामुळे अँड्रॉइडच्या जुन्या आवृत्तीवर चालणा-या फोनचा अनुभव फारच निराशाजनक होता. या समस्येवर मात करण्यात किटकॅट यशस्वी ठरल.
अँड्राइडची किटकॅट ही आवृत्ती ३४० एमबी मेमरीतही चांगला अनुभव देऊ शकते. याबरोबरच अँड्रॉइड वन या मोहिमेत गुगलकडून स्वस्तातील फोन उत्पादकांना डिझाइन रेफरन्सचे व्यासपीठ खुले करण्यात आले आहे. ४.५ इंचाचा डिस्प्ले, डय़ुअल सिम, एसडी कार्ड स्लॉट आणि एफएम रेडिओ यांसारख्या विकसनशील बाजारपेठेत लोकप्रिय ठरलेल्या वैशिष्टय़ांसह अँड्रॉइड वन फोन बाजारात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे ५००० ते ६००० रुपये एवढय़ा आक्रमक किमतींना ते उपलब्ध होणार असून स्टॉक अँड्रॉइडवर चालणा-या फोनला नियमित अपडेटही दिले जाणार आहेत. गुगलने मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाइस या भारतीय कंपन्यांबरोबर करार करत दिवाळीच्या तोंडावर पहिला अँड्रॉइड वन फोन लाँच होण्याची शक्यता आहे. अँड्रॉइड वनमध्ये समावेश नसलेल्या सॅमसंगला ही स्पर्धा आणखीनच जड जाणार आहे.