`सॅमसंग’ने गॅलक्सी टॅब `एस’ सीरीजचे दोन नवे टॅबलेट लाँच केले आहेत.
नवी दिल्ली- `सॅमसंग’ने गॅलक्सी टॅब `एस’ सीरीजचे दोन नवे टॅबलेट लाँच केले आहेत. आठ इंच आणि ९.७ इंचाचे हे दोन टॅब आहेत.
हे दोन्ही टॅबलेट ऑगस्ट महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनीने या टॅबलेटच्या किंमती अद्याप गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. या दोन्ही टॅबलेटची जाडी कमी असून हे टॅब वजनास हलके आहेत. ३२ जीबी आणि ६४ जीबी इंटरनल मेमरीची सुविधा या दोन्ही टॅबमध्ये देण्यात आली आहे.
‘सॅमसंग गॅलेक्सी टॅबलेट’चे फिचर्स
» आठ इंच डिस्प्ले
» अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप
» २०४८x१५३६ पिक्सेल स्क्रीन रेझोल्यूशन
» १.९ गिगाहर्टझ ऑक्टा कोअर प्रोसेसर
» तीन जीबी रॅम
» आठ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
» २.१ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» ३२ जीबी, ६४ जीबीची सुविधा