काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीकेची झोड उठवली.
नवी दिल्ली – खासदारांच्या निलंबनावरुन केंद्र सरकारला धारेवर धरणा-या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीकेची झोड उठवली.
गुरुवारी स्वराज यांनी लोकसभेत ललित मोदींना कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे म्हटले होते. तसेच ‘मी ललित मोदी यांना कोणतीही बेकायदेशीर मदत केली असेल तर त्याचा एकतरी पुरावा सादर करा’, असे त्यांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी म्हणाल्या, सुषमा स्वराज या नाटक करण्यात माहीर आहेत. मीही त्या महिलेला मदत केली असती मात्र कायदा मोडून नव्हे असेही पुढे सोनिया म्हणाल्या.
दरम्यान, संसदेतून २५ खासदारांचे निलंबन केल्याप्रकरणी काँग्रेसने आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे.