भारताचा सुमीत संगवान (८१ किलो) आणि विकास मलिकने (६० किलो) रविवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
अल्माटी (कझाकस्तान)- भारताचा सुमीत संगवान (८१ किलो) आणि विकास मलिकने (६० किलो) रविवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
ऑलिंपियन सुमीतने मोल्डोवाच्या पेत्रू सिओबानूचे आव्हान २-१ असे परतवून लावले. अन्य चुरशीच्या लढतीत विकासनेही पोलंडच्या डेव्हिड मिशेलूसचा २-१ असा पराभव केला.
‘‘तुल्यबळ प्रतिस्पध्र्यामुळे सुमीत आणि विकास या दोघांनाही दुस-या फेरीत चुरशीची झुंज द्यावी लागली. मात्र दोघांनी दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक करावे लागेल,’’ असे भारताचे प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांनी सांगितले.
आजच्या लढती (उपउपांत्यपूर्व फेरी)
मनप्रीत सिंग (९१ किलो) वि. तैमूर मामद्यॉव (अझरबैजान)
ननाओ थोकचोम (४९ किलो) वि. अॅँथनी रिव्हेरा (प्युएटरे रिको)
शिवा थापा (५६ किलो) वि. अल्बटरे मेलियन (अर्जेटिना)