राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि कृषिमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे ३१ कोटी ६२ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.
बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची कन्या, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ३१ कोटी ६२ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक अर्ज भरताना निवडणुक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक संदर्भात सर्व अपडेट्स आणि रंजक माहितीसाठी येथे क्लिक करा..
सुप्रिया, तिचे पती सदानंद सुळे आणि दोन मुले यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी सर्व मिळून ११३ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी संपत्ती असतानाही त्या दोघांच्या नावे कोणतेही चारचाकी वाहन नाही.
शपथपत्रात म्हटल्याप्रमाणे सुप्रियाकडे २५ हजार रुपयांची रोकड आहे. मात्र, बँक, सोने, जमीन, शेअर्स गुंतवणूक, घरे या माध्यमांतून त्यांच्या नावावर सुमारे ३१ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तसेच, परकीय बँका आणि विमा कंपन्यांमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे.
तसेच मुलगी रेवती आणि मुलगा विजय यांच्या नावावर एक पैसाही रोख रक्कम नसल्याचे निवडणूक अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.