पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी सुजाता सिंग यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली आहे.
नवी दिल्ली – पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सुजाता सिंग यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुजाता सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने नवे परराष्ट्र सचिव कोण होणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सुजाता सिंग (५९) ह्या १९७६ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या. परराष्ट्र सचिव पदाच्या स्पर्धेत सिंग यांच्यासोबत चीनचे भारतीय दुतावास एस. जयशंकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र सुजाता सिंग यांची या पदासाठी निवड करण्यात आली. सध्या त्या जर्मनी येथील भारतीय दुतावास आहेत.
पुढील वर्षी जूलै महिन्यात सुजाता सिंग ह्या सेवानिवृत्त होत आहेत. मात्र परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवण्यात आला आहे. सध्याचे परराष्ट्र सचिव रंजन माथई हे येत्या ३१ जूलैला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी सुजाता सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयात काम करणा-या निरुपमा राव आणि चोखीला अय्यर यांच्यानंतर सुजाता सिंग या तिस-या महिला आहेत. सुजाता सिंग यांचे पती संजय सिंग हेसुद्धा परराष्ट्र सचिव होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या गेल्या आठवड्यातील काश्मीर दौ-यानंतर सुजाता सिंग यांच्या परराष्ट्र सचिवपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले.