काश्मीरमधील कुपवारा जिल्ह्यातील केरान भागातून गुरुवारी लष्कराने चीनी बनावटीची विविध प्रकारची १०० हून अधिक शस्त्रास्त्रे जप्त केली
श्रीनगर – काश्मीरमधील कुपवारा जिल्ह्यातील केरान भागातून गुरुवारी लष्कराने चीनी बनावटीची विविध प्रकारची १०० हून अधिक शस्त्रास्त्रे जप्त केली. यात ९८ पिस्तुल आणि १० एके रायफल आहेत. ही शस्त्रास्त्रे ज्या कागदात गुंडाळलेली होती ते चीनी वर्तमानपत्र असल्याचे प्रवक्तत्याने सांगितले.
सीमेजवळील लष्कराच्या सर्तकतेमुळे मोठी अप्रिय घटना टळल्याचे लष्कराच्या प्रवक्तत्याने सांगितले. हिवाळयापूर्वी सीमेपलीकडून घुसखोरांसाठी मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा करण्याचा प्रयत्न होतो. ही शस्त्रास्त्रे त्याच कटाचा एक भाग असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.