कर्नाटक आणि मराठी सीमा प्रश्नावर आधारित एफडी प्रॉडक्शनच्या मराठी टायगर्स या सिनेमाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच समारंभ दिमाखात साजरा झाला.
कर्नाटक आणि मराठी सीमा प्रश्नावर आधारित एफडी प्रॉडक्शनच्या मराठी टायगर्स या सिनेमाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच समारंभ दिमाखात साजरा झाला. यावेळी मराठी टायगर्स या सिनेमाच्या पोस्टरचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती शंकर बजाज यांच्या हस्ते झाले तर म्युझिक लाँच समारंभ भारत स्टीलचे चेअरमन किशोरभाई शहा यांच्या हस्ते झाला.
कर्नाटकातल्या मराठी भाषिकांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारा हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एफडी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे, विक्रम गोखले, आशीष विद्यार्थी, विद्याधर जोशी, तेजा देवकर, महेशदादा, किरण शरद, अश्विनी एकबोटे, विकास पाटील, उमा गोखले, अशा दिग्गज कलाकारांचा अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अवधूत कदम यांनी केले आहे. या सिनेमाद्वारे प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता आशीष विद्यार्थी मराठीत पदार्पण करत आहे. त्यामुळे मराठी रसिकांना एका बॉलिवुड कलाकाराची नव्याने ओळख होणार आहे. कर्नाटक-बेळगाव प्रश्नाला सिनेमाद्वारे पहिल्यांदाच समोर आणण्याचा एफडी प्रॉडक्शनचा प्रयत्न आहे. त्यामुळे रसिक या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देतील असं मत चित्रपटाचे सहनिर्माते अभिजीत ताशीलदार यांनी व्यक्त केलं.