निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरुन नऊ करण्याचा प्रस्ताव तात्काळ स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरुन नऊ करण्याचा प्रस्ताव तात्काळ स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी अनुदानित सिलिंडरची संख्या नऊ करण्याच्या प्रस्तावाची माहिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाने स्व:हून पुढाकार घेत हे निर्देश दिले. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहून निर्णय स्थगित करण्याचे निर्देश देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातमध्ये सध्या आदर्श अचारसंहिता लागू आहे.
गुजरातमध्ये पहिल्या टप्याप्यात १३ डिसेंबर तर दुस-या आणि अंतिम टप्याप्यात १७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये अनुदानित सिलिंडरची संख्या वर्षाला सहा केली होती. ही संख्या नऊ करण्याचा प्रस्ताव होता.