|
गुप्तशत्रू अफवा पसरवतील
मेष – तणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यातून विश्रांतीसाठी मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवा. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत, तर पैसा कमावू शकाल. दूरवर राहणा-या नातेवाइकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल, म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि उत्साहात घालवाल. मित्र महत्त्वाचे असतात. पण तुमचे स्टेटस बिझी असेच ठेवा. कारण, कामाच्या ठिकाणी तुमचा अत्यंत धावपळीचा सप्ताह असणार आहे. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या अफवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम सप्ताह असेल.
लकी क्रमांक : ७
|
|
व्यावसायिकांना सप्ताह चांगला
वृषभ – रस्ता क्रॉस करताना विशेषकरून लाल सिग्नल असताना काळजी घ्या. दुस-यांचा निष्काळजीपणा तुम्हाला इजा पोहोचवू शकतो. आर्थिक बाबी हाताळताना अधिक काळजी घेणे सावधानता बाळगणे काळाची गरज आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. अर्धवट, अयोग्य कामात स्वत:ला गुंतवू नका. त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना चांगला सप्ताह. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी फार काही चांगला वेळ नाही. योग्य वेळी तुम्ही लक्ष दिले नाहीत, तर तुमच्या जोडीदाराचा आक्रमकपणा हाताळण्याच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे.
लकी क्रमांक : ७
|
|
गुंतवणूक लाभदायी
मिथुन – तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण, तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की, आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. कामाच्या ठिकाणी तुम्ही निराश असाल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा भरपूर वेळ खर्च होईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही अनुभवू शकाल. लकी क्रमांक : ५
|
|
प्रतिष्ठा वाढेल
कर्क – तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती उच्च असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा. त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून, तो उल्लेखनीय ठरेल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आरोग्याची काळजी घ्या.
लकी क्रमांक : ८
|
|
कार्यशील सप्ताह
सिंह – नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा. कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. आर्थिक स्थितीतील बदल नक्कीच होणार आहेत. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा सप्ताह आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा सप्ताह असेल. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतताभंग करतील.
लकी क्रमांक : ७
|
|
वाहन वेगाने चालविणे टाळा
कन्या – तुमची ऊर्जापातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कोणत्याही गोष्टींचा अंतिम निर्णय घेताना तुमच्या कुटुंबाचा त्याबाबत कौल घ्यावा. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतलात, तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल. कुटुंबाला विश्वासात घेऊन संवाद साधून सर्वोत्तम निर्णय घेण्यात यशस्वी ठराल. जर तुम्ही प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे. म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.
लकी क्रमांक : ५
|
|
अफवांपासून दूर राहा
तूळ – भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. तुमच्या पत्नीच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.
लकी क्रमांक : ७
|
|
मदतीचे वचन द्याल
वृश्चिक – तुमची प्रकृती संपूर्ण बरी राहणार नाही. समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा. पण, प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत वेळ काढता येणार नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला जाणीव होईल. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्या. लकी क्रमांक : ९
|
|
प्रेमाच्या वाटेला सुंदर वळण
धनु- आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा सप्ताह उजळून टाकेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून टोकणे टाळावे. तुमच्या प्रेमाच्या वाटेला एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल, तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. सप्ताह चांगला जावा असं वाटत असेल, तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.
लकी क्रमांक : ६
|
|
प्रलंबित गुंतवणूक टाळा
मकर- तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्र- मैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. तुमचा पारा चढल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही संकटात पडू शकता. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा सप्ताह असेल. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल. पण, नंतर तुम्हाला जाणवेल, जे झालं ते चांगल्यासाठीच होतं.
लकी क्रमांक : ६
|
|
खर्च आवाक्याबाहेर होईल
कुंभ- तुमची उच्च कोटी ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा. तुमच्या आवाक्याच्या बाहेर तुमचा खर्च होईल. त्यामुळे अनेक चालू असलेले प्रकल्प-योजनांना खीळ बसेल. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणा-या व्यक्तींपासून दूर राहा. तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. मित्र महत्त्वाचे असतात. पण, तुमचे स्टेटस बिझी असेच ठेवा. कारण कामाच्या ठिकाणी तुमचा अत्यंत धावपळीचा सप्ताह असणार आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही, तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.
लकी क्रमांक : ४
|
|
शब्द काळजीपूर्वक वापरा
मीन – मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचारपद्धती इतरांच्या मुलांमध्येदेखील आढळते. त्यातून आपणास मन:शांती तर मिळेलच. पण, तुमच्या व्यग्रता शांत करेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. मुलं आणि ज्येष्ठांची त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याबाबत अपेक्षा राहतील. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणा-या मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रात काम करावे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमचे असणे हे त्याच्या, तिच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा / तुमची जोडीदार तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.
लकी क्रमांक : २
|