![mesh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh.gif) |
अनुकूल वातावरण
मेष – आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला सप्ताह. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल; परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे.
लकी क्रमांक : ६
|
![rushabh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/rushabh.gif) |
रम्य आठवणीत रंगून जाल
वृषभ – तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्याजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. तुम्ही तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या जुन्या मित्राच्या भेटीमुळे सायंकाळ बहरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणींत रंगून जाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा सप्ताह वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने खूपच चांगला आहे.
लकी क्रमांक : ६
|
![mithun](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mithun.gif) |
संधीचे सोने कराल
मिथुन – मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम आणि नैराश्यापासून दूर राहा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल. लकी क्रमांक : ३
|
![karak](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/karak.gif) |
स्वप्नपूर्तीसाठी मुलांना प्रोत्साहन
कर्क – काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल; परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅण्टीक दिवसाचे वाटोळे करू शकतो. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू मित्र होतील. स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.
लकी क्रमांक : ७
|
![singh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/singh.gif) |
सहकारी समजून घेतील
सिंह – निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. मित्रवर्तुळात आखडू भूमिका घेऊन वागणे टाळा. नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला तर तुम्हाला महागात पडू शकते. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. रोजच्यापेक्षा तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही अनुभवू शकाल.
लकी क्रमांक : ५
|
![kanya](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kanya.gif) |
उत्तरार्धात आर्थिक स्थिती उत्तम
कन्या – नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल, तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची आत्यंतिक गरज आहे. उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. सर्वसाधारणपणे लाभदायक सप्ताह आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रेमाने भरलेले वातावरण राहील. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.
लकी क्रमांक : ३
|
![tula](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/tula.gif) |
अतिरिक्त ज्ञानाचा फायदा
तूळ – तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की, आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. ग्रुपमध्ये सामील होणे दिलचस्प असेल, पण खर्चिकदेखील ठरेल, विशेषत: तुम्ही जर दुस-यांवर खर्च करणे थांबवले नाही तर क्वचित भेटीगाठी होणा-या लोकांशी संपर्क करण्यासाठी चांगला सप्ताह. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. अतिरिक्त ज्ञान व कौशल्ये शिकून घेण्यासाठी तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य सप्ताह आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.
लकी क्रमांक : ५
|
![wrachik](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/wrachik.gif) |
चैनीच्या वस्तू खरेदी टाळा
वृश्चिक – तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील; परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. घरातील आलिशान चैनीच्या वस्तूंसाठी अतिखर्च करू नका. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाइकाला भेटा. आपल्या प्रियजनाबरोबर शॉपिंगला गेल्यावर आक्रमक होऊ नका. कामाच्या ठिकाणची परिस्थिती काहीशी विचित्र असू शकेल; सर्वजण तुमच्या विरुद्ध आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल. असे वाटत असले तरी ते खरे नाही. खासगी आणि गोपनीय माहिती कधीही उघड करू नका. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या आनंदाला धक्का पोहोचविण्याची शक्यता आहे. लकी क्रमांक : ७
|
![dhanu](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/dhanu.gif) |
सहका-यांची मदत होईल
धनु- खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल; परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. आपल्या कुटुंबीयांशी कठोरपणे वागू नका, शांततेला मारक ठरू शकते. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला पाहायला मिळेल. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जीवावरच काम खेचून नेत आहात, असे चित्र असेल. सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा; परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. प्रवास कराल.
लकी क्रमांक : ४
|
![mesh1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh1.gif) |
प्रिय व्यक्तीला भेट द्यावी
मकर- तुम्हाला पार्टीमध्ये न्यूनगंडाची भावना ग्रासण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करा. त्याशिवाय तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकणार नाही. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ सप्ताह आहे. अर्धवट, अयोग्य कामात स्वत:ला गुंतवू नका, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत.
लकी क्रमांक : ६
|
![kumbh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kumbh.gif) |
प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य
कुंभ- आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. रोमान्ससाठी फार काही योग्य नाही, ख-या प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणा-या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. खासगी आणि गोपनीय माहिती कधीही उघड करू नका. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.
लकी क्रमांक : ३
|
![meen](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/meen.gif) |
कारणमीमांसा गरजेची
मीन – तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे यात सुधारणा करणा-या गोष्टी कराल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वासाठी आनंदी क्षण असेल. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खूश करण्याची अनेक कारणे आहेत. रोजच्या वैवाहिक आयुष्यात, मात्र थोडासा वेगळा असणार आहे.
लकी क्रमांक : १
|