![mesh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh.gif) |
ज्येष्ठांचा सल्ला घ्या
मेष – आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. घरात कोणतेही बदल करायचे असतील, घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला सप्ताह. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल.
लकी क्रमांक :७
|
![rushabh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/rushabh.gif) |
नवीन प्रकल्पाचा नीट विचार करा
वृषभ – मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी, तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. मित्र-मैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा.
लकी क्रमांक : ६
|
![mithun](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mithun.gif) |
सहली रम्य ठरतील
मिथुन – आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण, हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. तुमचा जोडीदार रोमँटिक मूडमध्ये असेल. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. प्रवास सांभाळून करा. सर्दी-खोकला या आजारापासून सांभाळून राहा. लकी क्रमांक : ६
|
![karak](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/karak.gif) |
खेळकर स्वभावाने प्रसन्न वातावरण
कर्क – आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषकरून मद्यपान टाळा. चैतन्याने सळसळता असा सप्ताह. अनपेक्षित लाभ दृष्टिपथात असतील. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवती-भवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. जर कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोन बाजूला ठेवला नाहीत, तर तुमच्या हातून कदाचित घोडचूक होईल. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या अफवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.
लकी क्रमांक : ९
|
![singh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/singh.gif) |
पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो
सिंह – तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्टय़ा कमजोर बनू शकाल. तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. नवी भागीदारी आशाजनक असेल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. कोणा तिस-याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.
लकी क्रमांक : ८
|
![kanya](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kanya.gif) |
मतभेदाला निमंत्रण
कन्या – तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवती-भवती असलेल्या लोकांना प्रभावित करील. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. मुलांशी असणारे मतभेद वादविवादाला निमंत्रण देतील आणि नैराश्य निर्माण करू शकतील. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.
लकी क्रमांक : ७
|
![tula](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/tula.gif) |
उधळपट्टी कराल
तूळ – उघडय़ावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या; परंतु खर्च करताना उधळपट्टी करू नका. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे सप्ताह उत्तेजनापूर्ण असेल. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर ती इच्छा पूर्ण होईल.
लकी क्रमांक : ९
|
![wrachik](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/wrachik.gif) |
संपर्कासाठी चांगला सप्ताह
वृश्चिक – दीर्घकालीन आजार-व्याधीकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. क्वचित भेटीगाठी होणा-या लोकांशी संपर्क करण्यासाठी चांगला सप्ताह. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. लकी क्रमांक : २
|
![dhanu](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/dhanu.gif) |
ताणतणाव वाढेल
धनु- इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. खूप अल्पसे अडथळे येतील; परंतु खूप काही यश मिळवाल असे दिसते. काही सहका-यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. तुम्ही खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ सप्ताह आहे!
लकी क्रमांक : १
|
![mesh1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh1.gif) |
अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम
मकर- कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमचे व्यक्तिमत्त्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे योग्य ते चीज होईल. तुम्हाला प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.
लकी क्रमांक : १
|
![kumbh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kumbh.gif) |
प्रियजनांचे प्रश्न सोडवा
कुंभ- कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल; परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या; परंतु खर्च करताना उधळपट्टी करू नका. जवळच्या नातेवाइकांची, त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल. पण, त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. तुमच्या लहरी स्वभावाला आवर घाला, अन्यथा तुमची मैत्री तुटू शकते. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुम्ही बराच काळ तुमच्या जोडीदाराला काही सरप्राईझ दिले नाहीत, तर लग्न हा एक त्रास होण्याची शक्यता असते.
लकी क्रमांक : ८
|
![meen](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/meen.gif) |
भागीदारांना म्हणणे पटवून द्याल
मीन – नैराश्य आणि दडपण तुमची मन:शांती बिघडवू शकतात. हुशारीने गुंतवणूक करा. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याचे नशिबाचे भोग टळतील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल.
लकी क्रमांक : ६
|