![mesh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh.gif) |
पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका
मेष – अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबीयांना मान खाली घालावी लागेलच, पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र, कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबीय आणि नातेवाइकांपर्यंत पोहोचवतील.
लकी क्रमांक : ५
|
![rushabh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/rushabh.gif) |
प्रकाशझोतात याल
वृषभ – अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. सामाजिक कामात रमाल; परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत, तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.
लकी क्रमांक : ४
|
![mithun](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mithun.gif) |
उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका
मिथुन – आपणास हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की, मानसिक आजार, शत्रू तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीवरदेखील परिणाम करतात, म्हणूनच अनावश्यक विचारांना मनात अजिबात थारा देऊ नका. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. कामाच्या ताणतणावांचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली भांडणं आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. लकी क्रमांक : २
|
![karak](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/karak.gif) |
नव्या कल्पना आणि योजना सुचतील
कर्क – अत्यंत व्यस्त सप्ताह असला तरी आरोग्य चांगले राहील. अनपेक्षितरीत्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. चांगले दिसण्यासाठी तुम्ही जे काही बदल कराल त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य वैतागतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. सप्ताह सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की, पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.
लकी क्रमांक : ६
|
![singh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/singh.gif) |
आर्थिक तोटा होण्याची शक्यता
सिंह – तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत, तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा सप्ताह आहे. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. हा सप्ताह तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेला असेल, ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.
लकी क्रमांक : ४
|
![kanya](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kanya.gif) |
कौटुंबिक आयुष्याला योग्य वेळ द्या
कन्या – तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे यात सुधारणा करणा-या गोष्टी कराल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. कौटुंबिक आयुष्याला योग्य तेवढा वेळ आणि लक्ष द्या. कार्यालयीन कामातील अतिरेकामुळे कौटुंबिक पातळीवर अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्ही त्यांची काळजी करता हे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कळू द्या. तुमच्या प्रेमात तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.
लकी क्रमांक : ३
|
![tula](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/tula.gif) |
कुटुंबाच्या गरजा समजून घ्या
तूळ – तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक सप्ताह. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल.
लकी क्रमांक : ५
|
![wrachik](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/wrachik.gif) |
व्यवहार करताना हित सांभाळा
वृश्चिक – तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. खूप सुंदर सप्ताह आहे. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत, तर तुम्ही फायद्यात राहाल. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. लकी क्रमांक :७
|
![dhanu](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/dhanu.gif) |
अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही
धनु- तुमच्या भवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. तुम्हाला दिलेली प्रत्येक सूचना तुम्ही टीका म्हणून घ्याल, जी तुमचा मूड घालवेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला सप्ताह. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला एक सुंदर सरप्राईझ देणार आहे.
लकी क्रमांक : ४
|
![mesh1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh1.gif) |
अंतर्मनाचा आवाज ऐका
मकर- धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी सप्ताह चांगला आहे. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटुंबातील सदस्यांना मदत करा. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील.
लकी क्रमांक : ४
|
![kumbh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kumbh.gif) |
राग अनावर होऊ देऊ नका
कुंभ- मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्याकडून अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे, तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वत:ला राजेशाही वागणूक द्या. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्ही संवेदनशील बनाल. तुमचा राग अनावर होऊ देऊ नका आणि कोणतेही बेजबाबदार कृत्य करू नका ज्यामुळे आयुष्यभर तुम्ही स्वत:लाच दोष देत राहाल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
लकी क्रमांक : २
|
![meen](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/meen.gif) |
भविष्यातील योजना आखा
मीन – जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. प्रेमसंबंधामध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही कदाचित त्रासलेले असाल त्यामुळे तुमच्या कामाच्या दर्जावर त्याचा परिणाम होईल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. संकटे ही आयुष्याचा भाग असतात आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यावर एखादे संकट येण्याची शक्यता आहे.
लकी क्रमांक : ८
|