|
काळजीपूर्वक वागण्याचा सप्ताह
मेष – अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चामधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा सप्ताह. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची तुम्हाला जाणीव होईल.
लकी क्रमांक : ७
|
|
संवाद कौशल्ये प्रभावी ठरतील
वृषभ – इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील; परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणा-या गोष्टी करा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर सप्ताह असेल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमची इच्छा नसताना तुमचा/तुमची तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा/तुमची तुम्हाला घरी थांबवेल, ज्यामुळे तुमची चिडचिड होईल.
लकी क्रमांक : ७
|
|
अस्वस्थ विषय बोलण्याचे टाळा
मिथुन – आर्थिक मर्यादा तुम्हाला नैराश्याकडे लोटतील. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल, तर नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. अडचणी आल्या की, चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मन:स्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. लकी क्रमांक : ५
|
|
प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल
कर्क – तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. जमिनीच्या वादातून भांडणतंटा मारामारी उद्भवू शकते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पालकांची मदत घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागलात तर नक्कीच आपले प्रश्न सुटू शकतात. रोमान्सची संधी स्पष्ट दिसेल. पण, ते क्षणकाल टिकणारे असेल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत, तर तुम्ही फायद्यात राहाल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत मनसोक्त गप्पा माराल.
लकी क्रमांक : ८
|
|
ख-या क्षमता ओळखा
सिंह – कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही, तर तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमच्या ख-या क्षमता काय आहेत ते ओळखा. पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. एखाद्या जुन्या मित्राच्या फोनमुळे सायंकाळ स्मरणरंजनात व्यतीत होईल. मैत्रीचे गाढ जीवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. प्रवास करावा लागणार असेल, तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत मनसोक्त गप्पा माराल.
लकी क्रमांक : ८
|
|
कामात मित्रांचा पाठिंबा असेल
कन्या – दीर्घकालीन आजार-व्याधीकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. एखाद्या कामात मित्रांचा पाठिंबा असेल. मात्र, तुमच्या जोडीदाराच्या मतभिन्नतेमुळे घरातील शांततेचा भंग होईल. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. प्रवास करणार असाल, तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी सप्ताह खूप चांगला आहे.
लकी क्रमांक : ५
|
|
अडचणी लवकर सोडविणे गरजेचे
तूळ – अतिव्यग्रता तुम्हाला दुबळे करेल. लांब अंतर चालत जा. स्वच्छ ताजी हवा छातीत भरून घ्या आणि या समस्येवर मात करा. तुमचे सकारात्मक विचार तुम्हाला यासाठी खूप मदत करतील. चैतन्याने सळसळता असा आणखी एक सप्ताह. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचा-यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.
लकी क्रमांक : ७
|
|
नवीन लोकांशी संपर्क होईल
वृश्चिक – कुटुंबातील सदस्यांशी तुमच्या अयोग्य वागणुकीमुळे वातावरण बिघडून जाईल. तुम्हाला इतरांकडून जशी वागणूक मिळणे अपेक्षित आहे, त्याच पद्धतीने तुम्ही इतरांशी वागले पाहिजे. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. अभ्यास आणि घरामध्ये मुलांचे लक्ष कमी असणे आणि आल्याच मित्र-मैत्रिणींमध्ये गुंतून राहणे तुम्हाला असमाधानी करण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमात तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल. लकी क्रमांक :९
|
|
प्रेमाची उणीव भासणारा सप्ताह
धनु- आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्धवस्त करून टाकतात. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. मुलं आणि ज्येष्ठांच्या त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याबाबत अपेक्षा राहतील. प्रेमाची उणीव भासणारा सप्ताह तुमच्या कार्यालयीन कामामध्ये बरेच अडथळे निर्माण होतील. प्रवासासाठी फार काही चांगला नाही. आरोग्याची काळजी घ्या.
लकी क्रमांक : ६
|
|
शब्द देण्यापूर्वी सर्व माहिती घ्या
मकर- अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. पुरातन वस्तू आणि दाग-दागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. त्याच त्याच कामातून थोडी उसंत घेण्याची गरज आहे आणि मित्रमंडळींसमवेत बाहेर जाण्याची गरज आहे. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू फारशी चालणार नाही. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. प्रवास करावा लागणार असेल, तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.
लकी क्रमांक : ६
|
|
प्रलंबित कामं बराच वेळ खातील
कुंभ- आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कुटुंबीयांच्या भावना समजून घ्या. तुम्ही आपल्या आर्थिक बाबतीत अति उदारपणे वागलात, तर घरातील प्रलंबित कामं तुमचा बराच वेळ खातील. एकतर्फी प्रेम तुम्हाला निराश करेल. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण, स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल, तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. संकटे ही आयुष्याचा भाग असतात आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यावर एखादे संकट येण्याची शक्यता आहे.
लकी क्रमांक : ४
|
|
स्वभावाचे परीक्षण करा
मीन – तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. तुमच्या उधळ्या स्वभावावर तुमचे कुटुंबीय टीका करतील. भविष्यासाठी तुम्ही पैशांची बचत केली पाहिजे, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. अतिभावनाप्रधानता तुमचा सप्ताह उद्धवस्त करेल. विशेषत: आपली प्रिय व्यक्ती दुस-यांशी अतिमित्रत्त्वाने वागताना पाहून तुम्हाला त्रास होईल. तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. प्रवासाच्या काही योजना असतील, तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला तुमचे कुटुंबीय आणि तो/ती यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगेल. हे केवळ तात्पुरते आहे. परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा.
लकी क्रमांक : २
|